Good Morning Messages in Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी संदेश :
नमस्कार, आज आम्ही मराठी मध्ये काही सर्वोत्कृष्ट शुभ सकाळ शुभेच्छा मराठी संदेश मध्ये सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या मित्र परिवाराला आकर्षित करू शकता. म्हणून आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट शुभ सकाळ शुभेच्छा मराठी संदेश (Good Morning Quotes in Marathi) आणले आहेत. हे फेसबुकवर आणि व्हाट्सअँपवर आपल्या मित्र परिवारासह शेयर करू शकता.
शुभ सकाळ शुभेच्छा संदेश | Good Morning Messages in Marathi
लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं
मग ती वस्तु असो वा
तुमच्यासारखी गोडं माणसं.
गुड मॉर्निंग
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक
नेहमी आठवणीत राहतात
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही
शुभ सकाळ
एकदा उमललेले फुल पुन्हा उमलत नाही
तसेच एकदा निघून गेलेली
वेळ पुन्हा परत येत नाही.
त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा.
शुभ प्रभात
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात.
शुभ सकाळ
शुभ सकाळ मराठी संदेश
चांगली माणस आपल्या जीवनात येणं
हे आपली भाग्यता असते आणि
त्यांना आपल्या जीवनात जपुन
ठेवणं हे आपल्यातली योग्यता असते.
शुभ प्रभात
फुलांच्या सुगंधाला चोरता येत नाही,
सूर्याच्या किरणांना लपवता येत नाही,
किती का दूर असेना आपली माणसं,
पण त्यांची आठवण मात्र विसरता येत नाही.
शुभ सकाळ
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा
ती म्हणजे नाव आणि इज्जत.
गुड मॉर्निंग
रोज गुड मॉर्निंग
म्हणण्यामागचा हेतू एवढाच की
भेट कधी ही झाली तरी,
आपुलकीची भावना रोज यावी.
शुभ सकाळ
शुभ सकाळ आठवण
गोड माणसांच्या आठवणींनी
आयुष्य कसं गोड बनतं
दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर
नकळत ओठांवर हास्य खुलतं.
शुभ प्रभात
स्वतः साठी वेळ द्या
कारण आपण आहोत तर जग आहे
आणि अतिशय महत्वाचे दुसऱ्यासाठी वेळ द्या
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.
शुभ सकाळ
संयम राखणे हा आयुष्यामधील फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करीत असतो.
शुभ सकाळ
वाणी, वागणूक आणि विचार हे
आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे
आपण जितका उच्च दर्जा राखाल
तेवढी उच्च किंमत मिळेल.
शुभ सकाळ
कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.
शुभ सकाळ
अगरबत्ती देवासाठी हवी असते
म्हणून विकत आणतात
पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.
शुभ सकाळ
प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी
माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो
यावरून त्याची किंमत होत नसते
तो इतरांची किती किंमत करतो
यावरून त्याची किंमत ठरत असते.
शुभ सकाळ
स्वतासाठी सुंदर घर करणे हे
प्रत्येकाचे एक स्वप्न असते
पण एखाद्याच्या मनात घर करणे
यापेक्षा सुंदर काहीच नसते.
सुप्रभात
जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद
कधीच कमी होऊ देत नाही.
शुभ सकाळ
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही
सुप्रभात
काळ कसोटीचा आहे
पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे
आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.
गुड मॉर्निग
Read More :
101+ Best Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी
शुभ प्रभात मराठी संदेश
खेळ असो वा आयुष्य
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल
गुड मॉर्निंग
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन
ते अंतःकरणाची संपत्ती आहे
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो
शुभ सकाळ
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधी
उपाशी मरत नाही.
शुभ सकाळ
मनात घर करून गेलेली व्यक्ती
कधीच विसरता येत नाही
घर छोटे असले तरी चालेल
पण मन मात्र मोठे असले पाहिजे.
शुभ सकाळ
शुभ सकाळ सुविचार SMS
जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.
शुभ सकाळ
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
गुड मॉर्निंग
वयाचंं काहिच देणंघेणं नसतंं.
जिथे विचार जुळतात तिथेच खरी मैत्री होते.
सुप्रभात
धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची
आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही.
शुभ सकाळ
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात
फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात.
शुभ सकाळ
परमेश्वर मंदिरामध्ये नाही
ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे
त्याच्याच अंत:करणात परमेश्वर आहे.
शुभ सकाळ
चहा सारखा गोडवा तुमच्या जीवनात यावा,
तुमचा आजचा दिवस आनंदित जावा.
शुभ सकाळ
कुणीतरी येऊन बदल घडवतील,
याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा..
शुभ सकाळ
कष्ट आणि मेहनत एवढ्या शांतपणे करायचं की,
आवाज फक्त आपल्या यशाचं घुमला पाहिजे.
सुप्रभात
संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे.
जेव्हा वसंत येतो, तेव्हा प्रकृती सुधारते
आणि जेव्हा संत येतात, तेव्हा संस्कृती सुधारते.
सुप्रभात