101+ Happy Diwali Wishes in Marathi 2024 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी | Happy Diwali Wishes in Marathi :

नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे. दिवाळी म्हणजे आनंद व रोषणाईचा सण. ह्याच सणानिमित्त आज आम्ही आपल्याला समोर काही निवडक आणले आहेत. आपण हे Diwali Greeting card in Marathi, Diwali Quotes in Marathi, Diwali Shubhechha, Happy Diwali wishes in Marathi, Happy Diwali Message in Marathi, Diwali Marathi WhatsApp, Diwali Banner in Marathi, Diwali Caption in Marathi, Diwali faral Quotes in Marathi, Diwali Status in Marathi, Diwali Padwa Quotes in Marathi, Diwali Marathi SMS, Marathi Diwali wishes, तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, Happy Diwali wishes in Marathi text, दीपावली शुभेच्छा संदेश मराठी,  Diwali Greetings Marathi, Diwali Shubhechha Marathi SMS यांचा वापर करू शकता आणि तसेच आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसह सामायिक करू शकता.

Click Here :  Best Happy Diwali  Wishes, Greetings, Messages, Status 2024

 

दिवाळी हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Happy Diwali Messages in Marathi | शुभ दीपावली

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट,
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी अत्तराचा घमघमाट,
लाडू, चकल्या करंज्यांनी सजले ताट,
पणत्या दारात एकशेआठ, आकाश दिव्यांची झगमगाट.
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

 

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास.
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा.

 

उटण्याचा नाजुक सुगंध घेऊन आली
आज पहिली पहाट पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल
आयुष्याची वहिवाट.
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा

 

Read More :

दीपावली की हार्दिक शुभकामनाएं | Happy Diwali Wishes in Hindi

 

Diwali Greetings Card in Marathi

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

 

चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती,
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी ठिणगी,
पेटताच फुलतील नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.
दिपावलीच्या हार्दिक शुभेछा

 

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण.
शुभ दीपावली

 

Happy Diwali Message in Marathi

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

अंगणात तुळस आणि शिखरावर कळस,
हीच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणि डोक्यावर पदर,
हीच आहे सौभाग्याची ओळख.
माणसात जपतो माणुसकी आणि नात्यात जपतो नाती
हीच आमची ओळख.
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा

 

जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

Diwali Shubhechha Marathi

आज लक्ष्मीपुजन तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून, भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहो..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेवूनी नवी उमेद,
नवी आशा होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा,
दिवाळीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

 

यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदील, आकाश उजळवणारे फटाके,
येत्या दिवाळीत हे सगळं तुमच्यासाठी
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा

 

Happy Diwali Wishes in Marathi

आली दिवाळी उजळला देव्हारा,
अंधारात या पणत्यांचा पहारा,
प्रेमाचा संदेश मनात रुजावा,
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

सगळा आनंद, सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
हि दीपावली आपल्या आयुष्याला,
एक नवा उजाळा देऊ दे.
दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा

 

रांगोळीच्या रंगांची,
उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
हि दीपावली आनंदाची, हर्षाची,
सौख्याची, समाधानाची !
आपण सर्वाना हि दीपावली आणि नूतन वर्ष
सुख समृद्धीचे, संकल्प-पूर्तीचे आणि
आरोग्य संपन्नतेचे जावो.
शुभ दीपावली

 

Shubh Diwali in Marathi

सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली.
शुभ दीपावली

 

दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं.
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

 

दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास,
फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास,
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो.

 

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय,
तुझी साथ ही दिवाळीच्या मिठाई पेक्षा गोड आहे.
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा

 

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
शुभ दिपावली

 

Diwali Quotes in Marathi

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

महालक्ष्मीचे करून पूजन, लावा दीप अंगणी..
धन-धान्य आणि सुख-समृद्धी, लाभो तुमच्या जीवनी..
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा

 

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
सरस्वतीपूजा व दीपपूजा,
दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला..
दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा

 

Shubh Deepawali in Marathi

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

समृध्दीच्या कणाकणात सजावी, नटावी दीपावली,
हासत, नाचत, गात यावी दीपावली,
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे.
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे,
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे.
शुभ दीपावली

 

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

दीपावली शुभेच्छा संदेश मराठी

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

 

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली

 

आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आली
तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली
सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून
शुभ दिपावली

 

Happy Diwali Wishes in Marathi Text

धनाची पूजा, यशाचा प्रकाश कीर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लाक्ष्मीपूजन संबंधाचा फराळ,
समृद्धीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज
अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब सह परिवारास सोनेरी शुभेच्छा.

 

उत्कर्षाची वाट उमटली
विरला गर्द कालचा काळोख
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत.
Happy Diwali

 

ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

Diwali Greetings in Marathi

उटण्याचा मंद सुगंध घेऊन,
आली आज नरक चतुर्दशीची पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने,
उजळेल आयुष्याची वहिवाट
तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

 

Read More :


Follow us On : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Share this: