51+ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Best Gudipadwa Wishes in Marathi

Gudipadwa Wishes in Marathi | गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश :

आज आम्ही आपल्याला समोर काही निवडक गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (Gudipadwa Wishes in Marathi) यांचा वापर करू शकता आणि तसेच आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसह सामायिक करू शकता.

 

गुढीपाडव्याच्या हार्दिक संदेश | Gudipadwa Wishes in Marathi

चैत्राची सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट
आनंदाची उधळण अन सुखाची बरसात
नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ नवा विश्वास
दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात
तुम्हाला व तुमच्या सहपरिवारास
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांशा,
आपणास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला
पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला
त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली
नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला
अशा या आनंदमयी दिनी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

 

संस्कृतीच्या क्षितिजावर
पहाट नवी उजळून आली
आयुष्यात पुन्हा नव्याने,
क्षण मोलाचे घेऊन आली
वेचून घेऊ क्षण ते सारे.
आनंदे करू नववर्ष साजरे.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा
साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा
मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी,
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी.
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे.
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे.
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा.
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

नवे वर्ष नवा हर्ष, नवा जोश नवा उत्कर्ष,
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि
सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.
नव्या वर्षात आपल्या स्वप्नांना तेजोमयी किनार लाभों, हीच सदिच्छा.

 

वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाते मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

जल्लोष नववर्षाचा
मराठी अस्मितेचा
हिंदू संस्कृतीचा
सण उत्साहाचा
मराठी मनाचा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

श्रीखंड पूरी, रेशमी गुढी,
लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान.
आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा.

 

नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रुढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन.
तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

 

विश्वासाची काठी, विवेकाची वाटी,
अभ्यासाची पाटी, प्रयत्नांच्या गाठी,
हीच खरी जीवनाची गोडी,
उभारुया यशाची गुडी.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती.

 

दिवस उगवतात दिवस मावळतात
वर्ष येते वर्ष जाते पण हे ऋणानुबंध कायम राहतात.
हे असेच वृद्धिगत व्हावे हया सदिच्छासह
आपणास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.

 

शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवाती सोबत,
चैत्र पाडवा दारी आला.
नूतन वर्षाभिनंदन

 

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारु,
आला चैत्र पाडवा.

 

येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
या खास शुभदिनी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

पालवी चैत्राची
अथांग स्नेहाची,
जपणुक परंपरेची,
ऊंच उंच जाऊ दे गुढी
आदर्शाची , सप्ननतेची,
उन्नतीची आणि स्वप्नपुर्तिची.
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा.

 

नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

 

दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

 

नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

 

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
माझ्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा

 

चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरुवात
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

 

उभारा गुढी सुख समृद्धीची,
सुरुवात करुयात नव वर्षाची
विसरु ती स्वप्ने भूतकाळातील
वाटचाल करुयात नव आशेची
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

चैत्र पालवी फुलू दे,
नवी स्वप्ने उमलू दे,
गुढी पाडव्याच्या निमित्ताने
सुख-स्वप्ने सकारू दे
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

 

एक नवी पहाट, एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला, एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवी क्षितिजे,
सोबत एक माझी नवी शुभेच्छा
शुभ पाडवा

 

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

 

गुढी तोरणे उभारुनी दारी,
करू नव्या संकल्पाची वारी
मंगल दिनी मंगल समयी
सुख, समृद्धि येईल घरी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

उभारून गुढी, लावू विजयपताका
संस्कार-संस्कतीच्या विस्तारू शाखा
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

 

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा.
शुभ गुढीपाडवा


Follow us On : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Share this: