51+ Happy Makar Sankranti Wishes in Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा | Makar Sankranti Wishes In Marathi :

आज आम्ही आपल्याला समोर काही निवडक मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश (Makar Sankranti Wishes in Marathi) यांचा वापर करू शकता आणि तसेच आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसह सामायिक करू शकता.

 

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा | Makar Sankranti Wishes in Marathi

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा | Happy Makar Sankranti Wishes in Marathi

म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र…… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल
त…… तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

 

कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला.
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा

 

एक तिळ रुसला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

 

दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Read More:

Makar Sankranti Wishes in Hindi | मकर सक्रांति की हार्दिक शुभकामनाएं

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु.
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

 

तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण.
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.

 

दुःख सारे विसरून जाऊ
गोड-गोड बोलून आनंदाने राहु
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड
बोला शुभ मकर संक्रांती.

 

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा | Happy Makar Sankranti Wishes in Marathi

तुमचे पतंग आणि आनंद सर्वोच्च शिखरावर जावो.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

झाले गेले विसरून जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलू
संक्रांतीच्या­ हार्दीक शुभेच्छा.

 

आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे
चंद्र सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे.
तिळगुळ घ्या गोड़ बोला

 

दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा
रंग उडत्या पतंगाचा बंध दाटत्या नात्यांचा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा | Happy Makar Sankranti Wishes in Marathi

सण गोडवा जपण्याचा सण स्नेहभाव वाढविण्याचा.
शुभ संक्रांती

 

तिळकूटाचा सुगंध, दही चिवड्याची बहार,
तुम्हाला शुभेच्छा वर्षाच्या या पहिल्या सणाच्या.
हैप्पी मकर संक्रांत.

 

नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला

 

हलव्याचे दागिने, काळी साडी
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी
तिळगुळ घ्या गोड गोड बोला

 

फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा
जमत नसेल तर अनुभव सांगा
पण सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची,
कणभर तीळ, मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा, स्नेह वाढवा.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला

 

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या.
तिळगुळ घ्या गोड बोला

 

साजरे करु मकर संक्रमण करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन तिळगुळांची करु खैरात
हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

 

नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

तिळाची उब लाभो तुम्हाला
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला
यशाची पतंग उड़ो गगना वरती
तुम्हास अणि तुमच्या परिवारास.


Follow us On : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Share this: