101+ Best Marathi Suvichar | हृदयस्पर्शी मराठी सुविचार संग्रह

मराठी सुविचार संग्रह | Marathi Suvichar :

नमस्कार, आज आम्ही आपल्याला समोर काही निवडक मनाला स्पर्श करणारे मराठी सुविचार (Unique Marathi Suvichar) घेऊन आलो आहोत, यांचा वापर करू शकता आणि तसेच आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसह सामायिक करू शकता.

 

Best Marathi Suvichar | मराठी सुविचार संग्रह

कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही,
चूक तर आपल्या जीभीची आहे जीला फक्त गोडच आवडते.

 

जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते
जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सोडतो.

 

शब्द मोफत असतात पण
त्यांच्या वापरावर अवलंबून असते की,
त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल.

 

माणसं जरी सोन्यासारखी असली तरी
त्यांच्यातही कॅरेटचा फरक असतोच.

 

अजून वाचा :

101+ Best Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी

 

जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आर्थिक स्थिती नाही
तर मनस्थिती चांगली असावी.

 

अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे
अपेक्षा ठेवायची असेल तर विश्वास कमवावा लागतो.

 

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो,
फक्त आपल्याकडे माणूस Key असली पाहिजे.

 

स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवाव लागेलच.

 

अजून वाचा :

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज सुविचार

 

खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही.

 

लोकांच्या मनाला स्पर्श करण्याचा आनंद हा
आभाळाला स्पर्श करण्याच्या आनंदापेक्षाही मोठा असतो.

 

इतरांठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका
आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका.

 

काही वाक्य चेहर्‍यावर वाचता येतात त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते.

 

परमेश्वर मंदिरामध्ये नाही
ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे
त्याच्याच अंत:करणात परमेश्वर आहे.

 

सिंह हे शिकार करण्याचे स्वप्न पाहत बसत नाही
तर ते डायरेक्ट शिकार करतात.

 

आयुष्यात पुढे जायचे असेल तर
लाज आणि माज कधीच बाळगू नका.

 

भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन
आपण वर्तमानात हवं ते मिळू शकतो.

 

गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यवहारीक शिक्षणाने वाढते,
शाळेच्या मार्कानी नाही.

 

धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की
आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात.

 

आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत
हे महत्वाचे असते.

 

काही लोकं आनंद मिळेल ते काम करतात
तर काही लोकं मिळेल त्या कामात आनंद शोधतात.

 

निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी,
फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात.

 

कुठली ही अशक्य गोष्ट ती मिळेपर्यंतच कठीण असते.

 

स्वत:च्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की,
चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा
ठसका हा लागलाच पाहीजे.

 

गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो
आणि त्याचा समतोल साधतांना संपूर्ण आयुष्य निघून जात.

 

ज्या वेळी आपण इतरांमध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतो
त्या वेळी नकळतच आपल्यामध्येही चांगले पहाण्याची ती सुरुवात असते.

 

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत
अन् भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

 

तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका,
कारण तिला तुमच्यातील क्षमता माहिती नाही.

 

स्वतः कमावलेल्या पैश्यानी एखादी वस्तू खरेदी करून बघा,
तुमचे शौक आपोआप कमी होतील.

 

माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की
त्याची वृत्ती आपोआप चांगली होते.

 

आयुष्यात वेळेला महत्त्व द्या,
आणि तुम्हाला महत्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका.

 

आयुष्यात झालेला त्रास विसरून जा,
पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवा.

 

आपण जन्म घेतो तेव्हा आपण रडत असतो आणि
लोक हसत असतात.
मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि
लोक मात्र रडत असतील.

 

प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा,
काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल.

 

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते.

 

निराशावादी माणसे भूतकाळात जगत असतात
आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत
त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवत असतात.

 

जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या,
चांगलं वागणं कधीच सोडू नका,
कारण विजय हा नेहमी सत्याचाच होतो.

 

आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा
स्वभावाने कमावलेली माणसें जास्त सुख देतात.

 

आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलतां आले की
आयुष्यात हितचिंतकांची कमतरता कधीच भासत नाही.

 

खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही.

 

जगात तेच लोक तुम्हाला नाव ठेवतात
ज्यांची तुमच्यापर्यंत पोचण्याची औकात नसते.

 

आपला वेळ मर्यादित आहे
त्यामुळे दुसऱ्यांचे जीवन जगण्यामध्ये तो व्यर्थ करू नका.

 

दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून द्या की
मला जे मिळवायचे आहे, ते मी मिळवू शकतो.

 

काय चुकलं हे शोधाणारे आयुष्यात पुढे जातात,
कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात.

 

काही माणसं लाखात एक असतात,
आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात.

 

आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजे
रोजच स्तुती होत राहीली तर आयुष्यात प्रगतीचा मार्ग बंद होतो
व गर्वीष्टीचा मार्ग सुरु होतो.

 

आपली प्रतिष्ठा सांभाळणे महत्वाचे आहे
कारण हीच एक अशी गोष्ट आहे,
जी आपल्या वयापेक्षा जास्त टिकते.

 

योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं
आणि अयोग्य व्यक्तीपुढे गप्प रहाणे म्हणजे
येणाऱ्या संकटांना दूर ठेवण्यासारखे आहे.


Follow us On : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Share this: