Marathi Ukhane for Female | मराठी उखाणे नवरी साठी :
आज आम्ही आपल्याला समोर काही निवडक चांगले मराठी उखाणे नवरदेवासाठी आणले आहेत. आपण हे Marathi Ukhane, Marathi Ukhane for Female किंवा लग्नातील उखाणे मराठी नवरी साठी सारख्या Ukhane in Marathi, Marathi Ukhana, मराठी उखाणे, Ukhane Marathi, Latest Marathi Ukhane For Bride यांचा वापर करू शकता आणि तसेच आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसह सामायिक करू शकता.
अजून वाचा : 101+ Best Marathi Ukhane for Male | मराठी उखाणे नवरदेव साठी
मराठी उखाणे | Marathi Ukhane for Female | मराठी उखाणे नवरी साठी
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने ***** चे नाव घेते पत्नी या नात्याने.
अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वांग्याची फोड ***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड.
नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा ***** रावांच नाव मी घेईल तुमचा काय फायदा.
डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल *****रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.
सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले ***** रावाचे नाव घेऊन मी सौभाग्यवति झाले.
सुखाच्या पायर्या चढताना नाही दुःखाचा लवलेश ***** च नाव घेऊन करते गृहप्रवेश.
हिरव्या शालुला जरीचे काठ ***** चे नाव घेते प्लीज सोडा माझी वाट.
महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड ***** रावांना डोळे मारण्याची लई खोड.
श्रावणात येई, पावसाला जोर ***** राव भेटायला लागते, भाग्य खूपच थोर.
पैठणीवर शोभते, नाजूक मोरांची जोडी *****रावांमुळे आली, आयुष्याला गोडी.
चंदेरी सागरात, रुपेरी लाटा *****रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.
महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकुन ***** नाव घेते सर्वांच मान राखुन.
नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद ***** राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात.
कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार ***** रावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार !
रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल ***** राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.
मंद वाहे वारा, संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो ***** ची जोडी.
वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल ***** रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
मंथरेमूळे घडले रामायण ***** चे नाव घेते आज आहे सत्यनारायण.
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं ***** रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात ***** बसले दारात मी जाऊ कशी घरात.
बारीक मणी घरभर पसरले ***** साठी माहेर विसरले.
जशी आकाशात चंद्राची कोर ***** पती मिळायला माझे नशीब थोर.
देवापुढे लावली, समईची जोडी ***** मुळे आली, आयुष्याला गोडी.
श्रीकृष्णाने लिहीली भगवतगीता ***** माझे राम तर मी त्यांची सीता.
आजच्या सोहळ्याचा थाट केलाय खास ***** ना भरविते जिलेबीचा घास.
श्रावणात पडतात सरीवर सरी ***** रावांच नाव घेताना मी होते बावरी.
चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा ***** च्या नावाने भरला हिरवा चुडा.
देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे ***** चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.
हळद असते पिवळी, कुंकु असते लाल ***** रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल.
संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला ***** रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.
समुद्राला आली भरती, नदीला आला पूर ***** करता माहेर केले मी दूर.
एक दिवा दोन वाती एक शिंपला दोन मोती, अशीच राहु दे माझी व ***** रावांची प्रेम ज्योती.
प्रेमाच्या पाण्याचा घेतला मी घोट ***** च नाव घेतील माझे हे ओठ.
अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी, आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे ***** रावांची राणी.
धरला यांनी हात, वाटली मला भिती, हळूच म्हणाले *****राव अशीच असते प्रिती.
झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी, आयुष्यभर सोबत राहो माझी व ***** ची जोडी.
दीन दुबळ्यांचे गाऱ्हाणे परमेश्वरानी ऐकावे, ***** रावां सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.
नाव घ्या नाव घ्या असा घालू नका वाद ***** रावांच नाव घेऊन मिळविन सगळ्यांची दाद.
पहाटेच्यावेळी दवबिंदू पानावर पसरले ***** ना पाहून मी देहभान विसरले.
एक होती चिऊ, एक होता काऊ ***** रावांचे नाव घेते डोके नका खाऊ.
अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस ***** रावांच नांव घेताना, कसला आला आळस.
लग्नाचे दोन क्षण होत आहेत पूर्ण *****रावांचे नाव घेते जीवन झाले आता संपूर्ण.
पारलेची बिस्किटे, बेडेकरंचा मसाला ***** नाव घ्यायला आग्रह कशाला.
माहेर आणि सासर दोन्ही घरे असतील मोठ्या मनाची ***** रावांसोबत माझे लग्न म्हणजे गोष्ट आहे सन्मानाची.
संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा *****रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.
एक तीळ सात-जण खाई ***** ना जन्म देणारी धन्य ती आई.
चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप ***** रावां समवेत ओलांडते माप.
वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल *****रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
शिवरायांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने ***** रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्तिने.
श्रीकृष्णाने लिहीली भगवतगीता ***** माझे राम तर मी त्यांची सीता.
शुभवेऴी शुभदिनी आली आमची वरात *****रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात.
संसाराच्या सागरात, प्रेमाची होडी ***** रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले ***** रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले.
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं ***** रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे ***** सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.
मंदिरात वाहते, फुल आणि पान ***** रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान.
भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी ***** ची आणि माझी, लाखात एक जोडी.
इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून ***** चं नाव घेते ***** ची सून.
सुखाच्या पायर्या चढताना नाही दुःखाचा लवलेश ***** च नाव घेऊन करते गृहप्रवेश.
हिरव्या शालुला जरीचे काठ ***** चे नाव घेते प्लीज सोडा माझी वाट.
ताजमहाल बांधायला कारागिर होते कुशल ***** रावांच नाव घेते तुमच्या साठीच स्पेशल.
*****ला जाताना लागतो *****चा घाट, अख्ख्या गावात नाही ***** रावांसारखा थाट.
तुळशीची करते पूजा, शंकराची करते आराधना ***** रावांना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराला प्राथर्ना.
हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा ***** रावांना घास घालायला वेळ कशाला हवा !
चंदेरी सागरात, रुपेरी लाटा *****रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.
सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी ***** रावांचा नाव घेते सात जन्मासाठी.
बारीक मणी घरभर पसरले ***** साठी माहेर विसरले.
तांब्याच्या पळीवर नागाची खून ***** रावांचा नाव घेते *****ची सून.
जशी आकाशात चंद्राची कोर ***** पती मिळायला माझे नशीब थोर.
वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा ***** चे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा.
पाच वर्षांचा संसार पण प्रत्येक दिवस गोड, तिन्ही सांजेला मनाला लागे ***** रावांची ओढ.