101+ Best Aathavan Marathi Status | सर्वोत्तम आठवण स्टेटस मराठी

Aathavan Marathi Status | आठवण स्टेटस मराठी :

आज आम्ही आपल्याला समोर काही निवडक Miss You Status in Marathi, Aathavan Marathi Status, आठवण स्टेटस मराठी यांचा वापर करू शकता आणि तसेच आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसह सामायिक करू शकता.

 

आठवण स्टेटस मराठी | Aathavan Marathi Status

तुझी आठवण आली की मी हसत राहीन,
या जन्मी मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन.

 

डोळ्यांत साठलेल्या तुझ्या आठवणी
रात्र ही सरता सरेना,
किती दिवस लोटले तुला पाहुन
स्वप्नात तरी ये ना.

 

तुला आठवताना एक भान मला राखावं लागतं,
असं देहाचं उजळणं काळोखात झाकावं लागतं.

 

खंर सांगू माझ्या प्रतिबिंबाला असतात
माझ्यासारख्याच भावना,
म्हणून तर तुझ्या मनाच्या दारातून
मी आल्यावर सुद्धा ते जाईना.

 

अजून वाचा :

101+ Best Marathi Suvichar | हृदयस्पर्शी मराठी सुविचार संग्रह

 

मराठी मेसेज आठवण

रातराणीच्या फुलांनी हि सांज बहरू दे,
तुझ्या आठवणींच्या सुगंधाने माझे मन दरवळू दे.

 

विसरलो नाही तुला मी कणभर
मनात तुझ्या मीही असेन खरंतर
अजूनही काव्य लिहितो मी तुझ्यावर
वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर.

 

दिवस नकळत जाई, रात्र रेंगाळत राही..
असा एकही क्षण नाही की, तुझी आठवण येत नाही.

 

आठवणी हसवतात.
आठवणी रडवतात.
काहीच न बोलता आठवणी निघून जातात.
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात.

 

Aathvan Quotes in Marathi

माझ्या एकाकी जीवनात केवळ,
तू एक आठवण बनून राहलीस.
अन माझ्या प्रत्येक सुख दु:खात,
तू डोळ्यातील अश्रू होऊन वाहलीस.

 

येईन किंवा न येईन परत तुझ्या भेटीला,
आठवणी मात्र बांधुन ठेवीन काळजातल्या गाठीला.

 

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला की फुले सुकून जातात.
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात.

 

तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करणं मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय मन मात्र कशात रमत नाही.

 

आठवण शायरी मराठी

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.
कारण ही विसरता येत नाही,
अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.

 

डोळ्याना सांगीतलय मी आज रात्र जागायची आहे.
ऐकलय की, तुझी आठवण येणार आहे.

 

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं.
तुला खरचं ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.

 

पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत..
आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत.

 

Miss You Quotes in Marathi

हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे.
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे.

 

मनाच्या शिंपल्यात जपावा आठवणींचा मोती,
अशीच फुलत रहावी साताजन्माची नाती.

 

माझ्या सावलीला ही सवय तुझ्या आठवणींची
आठवणीतच तुझ्या पांघरून घेण्याची
एकटेपण स्वतःच वाटून घेण्याची
सवय झाली आहे आता तुझ्याविना आठवणीत जगण्याची.

 

मनाचे भाव असतात साधे भोळे,
तुझी आठवण येताच भरतात डोळे.

 

आठवण प्रेमाची शायरी

हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात तुझीच आठवण ताजी आहे.
शरीराने कितीही दूर गेलीस तरी, मनाने अजूनही तू माझीच आहे.

 

नातं जपलं की सगळं जमतं,
हळूहळू का होईना कोणी आपलसं बनतं,
ओळख नसली जन्माची तरी साथ देऊन जातं,
आठवणीचं गाठोड अन् डोळ्यात प्रेमाचा ओलावा
देऊन आपलसं करुन जातं.

 

जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात,
तू नसलास आता तरी तेच क्षण मला आजही आठवतात.

 

आजही मला एकटच बसायला आवडत.
मन शांत ठेवून आठवणींच्या विश्वात रमायला आवडत.

 

Aathvan Status in Marathi

मनात आठवणी तर खूप असतात,
कालांतराने त्या सरून जातात,
तुमच्यासारखी माणसे खूप कमी असतात,
जे हृदयात घर करून राहतात.

 

अश्रु लपविण्यांच्या प्रयत्नांत मग मी मलाच दोष देत राहते,
आणि या खोट्या प्रयत्नांत तुला आणखीनच आठवत राहते.

 

आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारण मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात.

 

येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणी शिवाय येत नाही,
दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही.

 

Miss You Shayari Marathi

स्तब्ध उभं राहून बघ ही वाट तुला पळताना दिसेल,
आणि कुणाच्या आठवणीने हळुच मागे वळताना दिसेल.

 

शांत संध्याकाळी समुद्रकिनारी
तूझी वाट बघत मी बसलो होतो.
दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी
एकटाच बोलत बसलो होतो.

 

का मलाच तुझी इतकी आठवण येते,
माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते.

 

वेळ लागला तरी चालेल पण वाट तुझीच पाहीन,
विसरलास तू मला तरीही नेहमी मी तुझीच राहील.

 

आठवण तुझी स्टेटस

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अंधार दाटला होता.
भूतकाळातील आठवणींना आज पाझर फुटला होता.

 

तुझी आठवण म्हणजे कस्तुरी,
कधीच साथ न सोडणारी,
सदैव सोबत दरवळत रहणारी,
पण तशीच हवी हवीशी वटणारी.

 

मला विसरण्याची तुझी सवय जुनी आहे,
तुझ्या आठवणीत माझी रात्र सुनी आहे.

 

येणा-या प्रत्येक सावळीत तुझाच भास आहे,
तू येशील अशी उगीचच आस आहे.

 

सा-यांसाठी झिजताना मी फ़क्त तुझीच उरणार आहे,
झिजून जरी गेले तरी मी तुझ्या आठवणीत विरघळणार आहे.

 

विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,
तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट.

 

Miss You Status in Marathi

‎प्रेमाच्या‬ या प्रेमळ हृदयात‬ आज अचानक ‪धडधड‬ झाली.
डोळे‬ भरले पाण्यांनी‬ आणि ‪पुन्हा‬ तुझी ‪‎आठवण‬ आली.

 

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन.
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.

 

आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण तुझी येत राहील,
अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल.

 

माझ्या आठवणींना तुझ्या सोबतीची जोड असते.
तू सोबत असलीस की, प्रत्येक आठवण गोड असते.


Follow us On : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Share this: